आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शनिवारी सकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर यांचा हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्या वेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील, अनन्या पाटील, मानसी चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थिती होते.
तोंडवळी ग्रामपंचायत येथे माझी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी












