कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरवल गावात ओहोळात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला वाहून गेली असून पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. प्रचिती प्रशांत कुडतरकर ( वय 35) असे मृत महिलेचे नाव असून हि दुर्घटना 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घडली. मृत प्रचिती हीचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
ओहोळात वाहून गेलेल्या महिलेचा मृत्यू ; शिरवल मधील दुर्घटना












