खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या कोकणात वादळ वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण बंदरवाडी येथे आज संध्यकाळी ६.३० वाजता एक जुनाट आब्यांचे झाड कोसळून पडल्यामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी गाडीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.तर इस्माईल मुकादम यांच्या घरावर व शेडवर देखील या झाडाचा मोठा फांदा पडल्याने त्यांचे देखील नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,कणकवली तालुक्यातील खारेपाटण बंदरवाडी येथे जोरदार पर्जन्यवृष्टी व वादळ झाल्याने येथील एक जुने आंब्याचे झाड या वादळात कोसळून पडल्याने झाडाखाली उभ्या असलेल्या येथील रहिवासी अवधूत भास्कर गूनिजन यांच्या वॉगनर कंपनीची चार चाकी गाडी नंबर-एम एच ०७ ए बी १२३ या गाडीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून अंदाजे सुमारे ८०,००० पेक्षा अधिक रूपयाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती आहे.
खारेपाटण बंदरवाडी येथील रहिवासी इस्माईल मुकादम यांच्या घरावर देखील आंब्याच्या झाडाची फांदी पडल्याने शेड चे नुकसान झाले आहे.या आंब्याच्या झाडाखाली अन्य देखील गाड्या उभ्या होत्या मात्र सुदैवाने या गाड्या वाचल्या.अपघात घडताच खारेपाटण बंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मुकादम,वसीम मुकदाम तसेच ग्रमस्थानी आंब्याचे कोसळलेले झाड बाजूला करत गाडी बाजूला केली.















