चिंचेचे झाड घरावर कोसळून लाखोंचे नुकसान ;पडेल येथील घटना

आरिफ बगदादी यांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य

देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील पडेल मधलीवाडी येथील बिपीन येरम यांच्या घरावर चिंचेचे भलेमोठे झाड कोसळून लाखोंचे नुकसान झाले. 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजता ही दुर्घटना घडली. भाजपा जिल्हा सरचिटणीस अरिफ बगदादी यांच्यासह सरपंच भूषण पोकळे, संजय मुळीम, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत येरम यांच्या घरावरील झाड हटवण्याच्या मदतकार्यात सहभाग घेतला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी येरम यांच्या छप्पर व अन्य साहीत्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.स्थानिक तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. येरम याना धीर देत आरिफ बगदादी यांनी शासकीय स्तरावरून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

:

error: Content is protected !!