पिडब्ल्यूडी च्या अक्षम्य नियोजनाने चिखलाचे साम्राज्य
आ.नितेश राणेंकडे पिडब्ल्यूडी अभियंत्यांची पोलखोल करणार
अजित नाडकर्णी यांचा संतप्त इशारा
फोंडाघाट (प्रतिनिधी): फोंडाघाट मध्ये मागील 2 दिवस ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. गटारत् नसल्याने एसटी स्टँड सह परिसरात गुडघाभर पाणी तुंबत आहे.तर बाजारपेठेत पिडब्ल्यूडी ने सुरू केलेल्या रुंदीकरण कामाचे नियोजनच नसल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याकडे सार्वजनीक बांधकाम दृर्लक्ष केले आहे.बाजरपेठेत ग्राहक आणि पादचाऱ्यांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे.पिडब्ल्यूडी च्या या ढिसाळ कामाची तक्रार आमदार नितेश राणेंकडे करणार असल्याचा संतप्त इशारा माजी ग्रा पं सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.












