सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): पारिजात मुंबई या सेवाभावी संस्थेकडून तिर्लोट मोहूळ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. पारिजात या संस्थेने नावाप्रमाणे आपला सुगंध गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात पसरवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मोलाची मदत केली आहे.या किटमध्ये मुलांना शाळेत लागणाऱ्या सर्व साहित्याचा समावेश आहे…हे किट प्रत्येकी 500 रुचे आहे..या शैक्षणिक किट वाटप कार्यक्रमाची सुरवात वृक्षारोपण करुन करण्यात आली. पारिजात मुंबई या संस्थेने केलेल्या या अनमोल अशा मदतीबद्दल सर्व पालकांनी आभार व्यक्त केले….या कार्यक्रमासाठी शा.व्य.समिती अध्यक्ष नितीन जाधव, तिर्लोट उपसरपंच प्रताप तिर्लोटकर , ग्रा.प. सदस्या सानवी तिर्लोटकर, सचिन सावंत तसेच सर्व पालक उपस्थित होते