फोंडाघाट एसटी स्टँड मधील पाणी तुंबण्याला एसटी प्रशासन कारणीभूत

जमीन मोजणी होईपर्यंत पिडब्ल्यूडी ला गटार खोदाई ला केली मनाई

बाजारपेठेतील मोजक्यांनी केले नाहीय अतिक्रमण हटाव

कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट बाजारपेठेत चिखलाच्या साम्राज्याला आणि एसटी स्टँड परिसरात पाणी तुंबण्याला पिडब्ल्यूडी चा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याची ब्रेकिंग आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलवर प्रसिद्ध होताच त्याची दखल पिडब्ल्यूडी प्रशासनाने घेतली. पिडब्ल्यूडी प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसात फोंडाघाट एसटी स्टँड परिसरात पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी गटार खोदाई करणे आवश्यक आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने एसटी स्टँड परिसरात पाणी साचून प्रवासी आणि जनतेला त्रास होतो.यावर उपाय म्हणून पिडब्ल्यूडीच्या मालकीच्या जागेत पिडब्ल्यूडी कडून गटार खोदाई बाबत कार्यवाही सुरू केली होती. कटर त्याला एसटी प्रशासनाने हरकत घेत जमीन मोजणी करून एसटी च्या मालकीच्या जमिनी ची हद्द ठरवून घेतल्यानंतर गटार खोदाई करा असे कळवले. त्यामुळे जमीन मोजणी झाल्यानंतर गटार खोदाई करण्याशिवाय पर्याय नाही. फोंडाघाट बाजारपेठेत रस्ता रुंदीकरण काम सुरू आहे. त्याला बाजारपेठेतील बहुतांश व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत स्वखर्चाने पिडब्ल्यूडी च्या मालकीच्या जागेतील आपले अतिक्रमण हटवले. मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जणांनी आज उद्या करत अद्याप आपले अतिक्रमण हटवलेले नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरण आणि बाजारपेठेतील गटार बांधकामाचे पूर्ण कामही करता येत नाही. त्या व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण तात्काळ हटवून सहकार्य करावे असे आवाहन पिडब्ल्यूडी प्रशासनाने केले आहे. तसेच जनतेला चिखलाचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल असेही सांगितले.

error: Content is protected !!