सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी कंटक पाणंद येथे रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत विशाल प्रकाश मोहिते (३६, रा. कोल्हापूर) आढळला. त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. तो सावंतवाडी येथील एका दुकानात काम करत होता. गेली काही वर्षे तो सावंतवाडीतच वास्तव्यास होता. दुकानात काम करून सायंकाळी तो निघाला. शुक्रवारी सकाळी कंटक पाणंद येथे रस्त्यावर पडलेला एक तरुण दिसून आला. याबाबत सदर तरुण कामाला असलेल्या दुकानाच्या मालकाला कल्पना देण्यात आली. तसेच त्याच्या कोल्हापूर येथील नातेवाईकांनाही कळविण्यात आले. मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले.
कोल्हापूरच्या युवकाचा सावंतवाडीत मृत्यू












