उपजिल्हा रुग्णालयात खाजगी वॉर्डबॉय, क्लार्क हजर

आमदार नितेश राणेंची शब्दपूर्ती

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आपली शब्दपूर्ती केली असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी 8 वॉर्डबॉय आणि 4 क्लार्क एनजीओ मार्फत रुग्णसेवेसाठी हजर झाले.वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते. मुंबईतील एनजीओ मार्फत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात वॉर्ड बॉय आणि क्लार्क भरती करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.त्यानुसार आज हे कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात सेवेत हजर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!