एका दिवसात तीन पक्ष बदलणाऱ्यांना आपल्या पक्षात घेतल ही चूकच झाली माझी

जिल्ह्यात राष्ट्रवादी शिल्लक नाही म्हणणाऱ्यांनी दहा लोकांचा मेळावा घेऊन दाखवावा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच टीकास्त्र.

कुडाळ ( अमोल गोसावी ) : ” ज्यावेळी शरद पवार साहेबांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आजही सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या तर्फे आम्ही प्रत्येकजण शरद पवार साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत हे दाखवून देण्यासाठी आज सर्वजण मोठ्या संखेने उपस्थित राहिलात यावरून आपलं शरद पवार साहेबांवर असलेलं प्रेम तुम्ही दाखवून दिलात त्याबद्दल धन्यवाद. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद काय आहे हे येथील नेत्यांना जनतेला दाखवून देण्यासाठी आज हा मेळावा घेण्याचा खटाटोप आम्ही केला त्यात आम्ही शंभर टक्के यशस्वी यशस्वी ठरलो आहोत हे आजच्या उपस्थितीवरुन सिद्ध होते. “
असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज कुडाळ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पक्ष निरीक्षक शेखर माने, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सौ. अर्चना घारे परब , जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रसाद रेगे, व्हिक्टर डॉन्टस, रेवती राणे, नम्रता कुबल, सावली पाटकर, भास्कर परब, बाळ कनयाळकर, नझीर शेख, अवधूत रेगे , आत्माराम ओटवणेकर , पुंडलिक दळवी , अफरोज राजगुरू , हिदायतुल्ला खान आदी मान्यवर तसेच जिल्हा , तालुका पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना अमित सामंत म्हणाले कि , आमच्या पक्षात माझ्याच चुकीमुळे काही लोकं आली होती. एका दिवसात तीन पक्ष बदलले होते तरीही केवळ आपला पक्ष वाढावा म्हणून त्यांना पक्षात घेतलं होत. पण इकडे टेंडर मिळत नाही , विरोधी पक्षात आहोत , पक्ष पुन्हा सत्तेत कधी येईल माहीत नाही असा विचार करून ते पक्ष सोडून गेलेत, माझ्याकडे प्रतिज्ञा पत्रावर सहि करून दिली आणि तिकडे जाऊन दरबारात हजेरी लावली आणि सांगितले कि जिल्ह्यात राष्ट्रवादी शिल्लक नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी शिल्लक नाही अस जर त्यांना वाटत असेल ही गर्दी पहावी आणि याच्यापेक्षा १० लोकांचा तरी मेळावा घेऊन दाखवावा असे आव्हान दिले. राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेली नाही तर एक छोटासा कपचा उडाला होता तो कपचाही आज आम्ही भरून काढलाय हे आजच्या उपस्थितीवरून दिसून आलं. “

error: Content is protected !!