पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून चिंदर शेतकऱ्यांना आर्थिक मदत….!

३५ शेतकऱ्यांना मिळाली मदत

आचरा (प्रतिनिधी): चिंदर गावात अज्ञात आजाराने आतापर्यंत ३५ शेतकऱ्यांची ४३ गुरे दगावली आहेत. ऐन शेतीच्या हंगामातच ओढवलेल्या या संकटातून शेतकऱ्यांनसाठी भारतीय जनता पार्टी मदतीला धावून आली आहे.
चिंदर गावातील गुरांच्या दगावण्याच्या गंभीर प्रकाराचे गांभिर्य ओळखून काल भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, आचरा विभाग प्रभारी संतोष गावकर, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर यांनी ओरोस येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन या विषयी चर्चा करत मदतीची विनंती केली होती. तसेच केंद्रीयमंत्री नारायण राणे तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्या बरोबरही या विषयी दुरध्वनी वरुन संपर्क केला होता. शेतकऱ्यांनवर आलेल्या संकटाची दखल घेत पालकमंत्र्यांनी आज सकाळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याशी संपर्क साधत दोन लाखा पेक्षा जास्त मदत आपण तात्काळ पाठवून देत असल्याचे सांगितले.
संध्याकाळी ग्रामपंचायत येथे शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरुपाची प्रत्येकी 5000 रुपयाची रोख मदत देण्यात आली. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले संकट काळात भाजपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मायेचा हात देण्यात आला आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत व इतर ठिकाणी मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, प्रभारी सरपंच दीपक सुर्वे, जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, प्रकाश मेस्त्री, मंगेश गांवकर, संतोष गांवकर, अरविंद घाडी, अजित साटम, मनोज हडकर, केदार गांवकर, बाबू कदम श्रावण सोसायटी चेअरमन योगेश परब, यासह चिंदर येथील शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!