जमीनजागेच्या वादातून तोरसोळे येथे वरक कुटूंबियांमध्ये मारहाण

सातजणांविरूध्द गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी): जमीनजागेच्या वादातून तोरसोळे धनगरवाडी येथे वरक कुटूंबियांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी देवगड पोलीसांनी सिताराम वरक यांच्यासहीत सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना 20 जुलै रोजी सायंकाळी 6.55 वा.सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तोरसोळे धनगरवाडी नं. 2 येथील संतोष विठ्ठल वरक व सिताराम जानू वरक या वरक कुटूंबियांमध्ये जमीनजागेचे वाद आहेत.याच वादातून 20 जुलै रोजी संतोष विठ्ठल वरक व त्यांची आई सुनंदा ही पायवाटेने जात असताना सिताराम जानू वरक व त्यांच्या कुटूंबियांनी सायंकाळी 6.55 वा.सुमारास वाट अडवून शिवीगाळ केली.तसेच सिताराम जानू वरक, मंगेश सिताराम वरक व धाकू जानू वरक यांनी संतोष याची आई सुनंदा वरक हिच्या दोन्ही पायावर दांड्याने मारून तसेच तिच्या उजव्या डोळ्याचा भुवईवर दगड फेकून मारून दुखापत केली व संतोष वरक यांच्या दिशेने फेकून मारलेला दगड कपाळावर मध्यभागी लागून दुखापत केली.याप्रकरणी संतोष वरक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सिताराम जानू वरक, मंगेश सिताराम वरक, मनाली मंगेश वरक, धाकू जानू वरक, गीता गंगाराम वरक, जीवन गंगाराम वरक आणि ज्योती गंगाराम वरक या सातजणांविरूध्द भादवि 143, 148, 323, 336, 337, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम करीत आहेत.

error: Content is protected !!