देवगड तालुक्यात अतिवृष्टीने सुमारे ६० हजाराचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यात वादळी वा-यासह पडलेल्या कातवणेश्वर, हिंदळे, विजयदूर्ग, मोंड या गावांना मोठा फटका बसला असून सुमारे ६० हजाराचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात शुक्रवारी सकाळी १२० मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवस वादळी वा-यासह झालेल्या पावसाने कातवणेश्वर येथील संजय तुकाराम आचरेकर यांच्या गोठ्यावर झाड पडून सुमारे ३३,५०० रूपयाचे नुकसान झाले.येथीलच रविंद्र हरीश्चंद्र पेडणेकर यांचे माड वा-याने मोडून पडून नुकसान झाले.विजयदूर्ग येथील मनाली मनोहर भाबल, सुभाष रावजी भाबल यांच्या घरावर वा-याने नजिकचे शेवग्याचे झाड छप्परावर पडून सिमेंटचे पत्रे फुटून प्रत्येकी ३ हजार रूपयांचे नुकसान झाले.हिंदळे येथील वळंजू यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून १२ हजार रूपयाचे नुकसान झाले. मोंड येथील आत्माराम येसू पुजारे यांच्या राहत्या घराचे वादळी वाèयाने पत्रे फुटून ३८५० रूपयाचे नुकसान झाले.सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

error: Content is protected !!