श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचा चोखंदळ वाचक पुरस्कार उल्का घाडी यांना जाहीर…..!

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा आयोजित व कै. मारुती प्रभाकर आचरेकर स्मृतिप्रित्यर्थ अँड. सायली मारुती आचरेकर पुरस्कृत चोखंदळ वाचक पुरस्कार 2023 सौ. उल्का चंद्रकांत घाडी रा. आचरा यांना जाहिर झालेला असून सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, ग्रंथभेट असे असून सदर पुरस्काराचे वितरण मंगळवार दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी समारंभपूर्वक होणार आहे. सदस्या पुरस्कार अँड. सायली आचरेकर यांनी प्रायोजित केलेला असून वाचन संस्कृती वाढावी व वाचनालयाकडे वाचकांचा ओघ वाढावा या संकल्पनेतून आयोजित केलेला आहे. चोखंदळ वाचक पुरस्कार 2023 विजेत्या सौ. उल्का घाडी यांचे अँड. सायली आचरेकर बसेंच संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य व कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!