रणजित देसाई यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत घेतली पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट

नेरुर, सरंबळ मधील भूस्खलन व इतर समस्यांची माहिती देत उपाययोजनेची केली मागणी

तात्काळ दखल घेत पालकमंत्र्यांचे प्रशासनास तातडीने कार्यवाहीचे दिले आदेश

कुडाळ (अमोल गोसावी) : आज बुधवार दिनांक २६ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण , जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी, व जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री आवटी यांची जि. प. माजी उपाध्यक्ष श्री. रणजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि नेरुर , सरंबळ मधील समस्या मांडून उपाययोजनेची मागणी केली. यावेळी सरंबळ देऊळवाडी तसेच नेरूर कांडरीवाडी येथील कोसळलेला डोंगर व कुडाळ नेरुर वालावल चेंदवण कवठी रस्त्यावरील नेरुर कन्याशाळा येथील मोरी नुतनीकरण करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे विनंती केली.
रणजित देसाई यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागास तातडीने कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, सौ. संध्या तेर्से, बंड्या सावंत, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, रुपेश कानडे, पप्पू तवटे, सरंबळ सरपंच रावजी कदम, उपसरपंच सागर परब, अमोल कदम, माजी सरपंच अजय कदम, सुशिल कदम, बाळाजी कदम, श्रावण जाधव, ग्रामपंचायत सदस्य महेश सरंबळकर, बंटी गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते. सरंबळ देऊळवाडी येथील खचलेल्या डोंगराचा भराव रस्त्यावर आलेला आहे तो तातडीने जेसीबी लावून मोकळा करून त्या ठिकाणी गटार मारण्याचे काम उद्या सकाळी सुरू होणार आहे. तसेच यावर्षीच्या नियोजन समितीच्या आराखड्यांमधून त्या ठिकाणी संरक्षक भिंतीच्या कामाला मान्यता देऊन काम सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!