वाहनधारकांना खड्डे चुकवताना करावी लागते कसरत
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली – आचरा मार्गावर नेहमीच पावसाळ्यात खड्डे पडतात यंदाही कणकवली आचरा महामार्गावर जुन्या पोस्ट ऑफिस समोरील परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. आणि त्यामुळे वाहनधारकांना कसरत करून गाडी चालवावी लागते परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नागरिकांना देखील चालताना हे खड्डे डोकेदुखी ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीने हे खड्डे भरावयाचे आहेत.पण सध्या नगरपंचायतचे इलेक्शन न झाल्याने नगरपंचायत वर प्रशासक नेमण्यात आले आहे. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली झाल्याने या खड्ड्यांना आता नेमक वाली कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.