कोर्ले सातांडी धरणावरून फणसगाव पंचक्रोशीला मिळणार स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्याकडे केली मागणी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी विधानभवनात पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, बंड्या नारकर, माजी जि प सदस्य संजय बोंबडी, कृष्णा नर, उदय पाटील आदी उपस्थित होते. फणसगाव पंचक्रोशीतील स्वतंत्र सुधारित पाणी पुरवठ्याच्या मागणीचा प्रश्न ऐरणीवर असून यासंदर्भात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले. उंडील फणसगाव, विठ्ठलादेवी, बुरंबावडे, व कुणकवन या गावांसाठी कोर्ले सातांडी धरणावरून सुधारित स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मंजूर व्हावी अशी मागणी मंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिस दिला असल्याची माहिती बड्या नारकर यांनी दिली.

error: Content is protected !!