आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात वृक्षारोपण करत ठाकरे सेनेचे आंदोलन

तळेरे वैभववाडी महामार्गाच्या दुरावस्थेवरून उबाठा शिवसेना आक्रमक

कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे वैभववाडी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सद्या या मार्गावरील खड्डे खडी ने भरण्याचे काम सुरु असून पावसाळी डांबर किंवा पेवर ब्लॉक ने भरावे व रस्ता वाहतुकी साठी सुरळीत करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मात्र हा रास्ता काँक्रटीकरणासाठी मंजूर झाला असून या महामार्गासाठी २४९ कोटी मंजूर झाले आहेत. या कामाला पावसाळ्यानंतर सुरवात होईल. सद्या दुरुस्तीचे काम तात्पुरते सुरू आहे. मात्र या अधिकाऱ्यांकडून अश्या प्रकारे उतारे देऊन वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. त्यामुळे ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सूरच राहणार असा पावित्रा घेत खड्ड्यामध्ये झाडे लावून निषेध केला आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आमदार वैभव नाईक व अन्य पदाधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी ताब्यात घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्या पासून रोखले. आणि आंदोलनात मध्यस्थी ची भूमिका घेऊन हायवे प्राधिकरणाचे अतुल शिवणीवार यांना शिवसेनेच्या मागणीवर काय उपयोजना करता येईल. ह्यावर कार्यकरी अभियंता जाधव यांच्याशी दूरध्यानीवरून आमदार वैभव नाईक यांच्याची चर्चा घडवून आणली.

       १ ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता यांनी १ ऑगस्ट रोजी वैभववाडी येथे येऊन शिवसेनेशी चर्चा करणार आणि रस्तावरील खड्ड्यात उपाय योजना करू असे अश्वासन नाईक यांना दिले त्यामुळे 1 ऑगस्ट पर्यंत  आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.यावेळी उप जिल्हाप्रमुख  नंदू शिंदे,तालुका प्रमुख  मंगेश लोके, युवा सेना सचिव स्वप्नील धुरी, शहरप्रमुख  शिवाजी राणे, उपतालुका प्रमुख श्रीराम शिंगरे, सुरेश पांचाळ, सुनिल रावराणे, कोळपे सरपंच सुनिल कांबळे, लोरे सरपंच विलास नावळेकर, माजी सभापती दिपक पांचाळ, राजेश तावडे, जावेद पाटणकर इत्यादि शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!