महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची गटस्तरीय समरगीत स्पर्धा संपन्न

कुडाळ केंद्राने बाजी मारत पटकावला प्रथम क्रमांक

कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय ठाणे, गट कार्यालय, चिपळूण आयोजत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे दिनांक 28 जुलै 2023 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेला सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरी जिल्हा मधून एकूण 11 संघ सह भागी झाले.

या स्पर्धेत कुडाळ केंद्राने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे प्रथम क्रमांक – कामगार कल्याण केंद्र कुडाळ, दुसरा क्रमांक – कामगार कल्याण केंद्र, मालवण, तिसरा क्रमांक – कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी , उत्तेजनार्थ -1 कामगार कल्याण केंद्र, कुडाळ, कामगार वसाहत पिंगुळी, उत्तेजनार्थ -2 कामगार कल्याण केंद्र, पोफळी. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तर प्रमुख पाहुणेम्हणून श्री. निलेश नारायण राऊळ उपव्यवस्थापक ( मास ) महावितरण कंपनी मर्यादित. विभागीय कार्यालय कुडाळ, विशेष उपस्थिती म्हणून श्री. नंदकिशोर मारुती करावडे व्यवस्थापक कार्य लक्षी संचालक कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ, कुडाळ तसेच मोहन गुरुनाथ होडावडेकर कार्यकारी संचालक कॉर बॅक अध्यक्ष कुडाळ एम. आय. डी. सि. इन्ड्री. असो. आणि दीपक गायकवाड , श्री. सीताराम पालव , श्री. अमोल तलावडेकर तसेच केंद्र प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. निलेश मेस्त्री, श्री. किशोर सावंत, सौ. मंजिरी धोपेश्वरकर यांनी काम पहिले. तसेच श्री. अरुण लाड कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय चिपळूण हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष नेवरेकर संचालक कामगार कल्याण केंद्र, कणकवली यांनी केल तर कार्यक्रमाचे आभार सौ. सुस्मिता नाईक यांनी मानले.

error: Content is protected !!