धामापूर गावडेवाडी रस्त्यानजिकचे धोकादायक झाड हटवले

घरासह , विद्युत तारा , वीज खांबांना होता धोका

चौके (अमोल गोसावी) : धामापूर – आंबेरी रस्त्यावरील गावडेवाडी येथे सत्यवान गावडे यांच्या घरावरील सुकलेले धोकादायक आंब्याचे झाड वीज वितरण कर्मचारी योगेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकांची मदत घेऊन शनिवारी तोडण्यात आले. सदर झाडामुळे रस्त्यावरून ये जा करणारे नागरीक तसेच जवळच असलेले सत्यवान गावडे यांचे घर आणि विद्युत तारांसह चार वीज पोल ना धोका निर्माण झाला होता. तसेच एस. टी. वाहतूकीसही अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबत धामापूर उपसरपंच श्री रमेश निवतकर यांनी वीज वितरण विभागाला धोकादायक झाड तोडण्यासंबंधी निवेदन दिले होते. त्यानुसार सदर धोकादायक झाड स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शनिवार दिनांक २९ जुलै रोजी तोडण्यात आले . यावेळी धामापूर ग्रामपंचायतचे सरपंच सौ मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर, ग्रा. प. सदस्य स्वप्निल स्वप्निल नाईक प्रशांत गावडे तेजस्विनी भोसले तसेच सत्यवान गावडे, बाळा गावडे, संजय गावडे, सचिन गावडे, बंड्या गावडे , काका मराठे, आनंद गावडे, दीपक गावडे बाबू आंगणे, महेश धामापूरकर, महेश परब, दिनेश ठाकूर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्याबद्दल धामापूर गावातील सर्व ग्रामस्थांनी संबंधित विभाग, वीज कर्मचारी आणि धामापूर ग्रामपंचायत चे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!