आ.नितेश राणेंनी उदघाटन केलेल्या शाळेत शिक्षक न मिळणे हे जि प मधील माजी सत्ताधाऱ्यांचे दुर्दैव – गुरूप्रसाद शिंदे
खारेपाटण (प्रतिनिधी ): “कोण अनिकेत जामसंडेकर ? यांना आम्ही ओळखत नाही.त्यांनी संबधित शाळेची येऊन पाहणी केली आहे का? खारेपाटण गावासाठी त्यांचे योगदान काय? रामेश्वर नगर खारेपाटण शाळेचे आंदोलन हे पक्षाचे नसून येथील ग्रामस्थ व पालकांनी शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा. याकरिता केलेले असून येथील ग्रामस्थांना शाळेला शिक्षक मिळावा या करीता आंदोलन करण्याची पाळी येणे म्हणजे येथील सत्ताधारी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे हे अपयश असून आमचे पक्षाचे कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्यावर टीका करण्याची अनिकेत जामसंडेकर यांची लायकी नाही.”अशी टीका शिवसेना पक्ष खारेपाटण विभाग प्रमुख व खारेपाटण ग्रा.पं. सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे यांनी प्रसिधीपत्रकाद्वारे केली.
खारेपाटण येथील ग्रामस्थ अनिकेत जामसंडेकर यांनी नुकतेच खारेपाटण रामेश्वर नगर जि.प.शाळा बंद आंदोलन बाबत आपली भूमिका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली होती.याला प्रतिउत्तर देताना आज खारेपाटण येथे शिवसेना पक्ष कार्यालयात गुरूप्रसाद शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिकेत जामसंडेकर यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुकांत वरूणकर,कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गुरूप्रसाद शिंदे पुढे म्हणाले मुळात रामेश्वर नगर शाळेसाठी केलेले आंदोलन हे शिवसेना पक्ष म्हणून केलेले नसून ग्रामस्थानी एकत्र येऊन मंगेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक मिळावा म्हणून आंदोलन जाहीर केले होते.भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यात वेळीच लक्ष घालून ही बाब आमदारांच्या निदर्शनास आणून दिली असती तर त्यांनी कायमस्वरूपी शिक्षकाचा प्रश्न सोडवला असता व येथील ग्रामस्थांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती.तसेच आपले अपयश झाकण्यासाठी अनिकेत जामसंडेकर सारख्या प्रवृत्तींनी खारेपाटणच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांबद्दल चुकीची माहिती वरिष्ठ नेतृत्वाला देऊन आजपर्यंत त्यांचे खाच्चिकरन करण्याचे काम केले आहे.
ज्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घघाटन मा.आमदार नितेश राणे यांनी केले.अशा शाळेतील मुलांचे शैक्षनीक नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थानी आंदोलन जाहीर केले. राज्यात शिवसेना – भाजपची युती आहे.असे असताना आमदारांची शबासकी मिळविण्यासाठी त्यांच्या सोबत राहून काहीजण आमदार साहेबाना चुकीची माहिती देत आहेत.या ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात दिलेला कामगिरी शिक्षक रामेश्वर नगर खारेपाटण शाळेला कायमस्वरूपी मिळेल असा आदेश आमदाराकडून आणला. तर आम्ही शाळेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करू.असे देखील खारेपाटण शिवसेना विभाग प्रमुख श्री गुरूप्रसाद शिंदे यांनी यावेळी सांगितले.