खारेपाटण केंद्र शाळेत शालेय स्वराज्य निवडणूक बिनविरोध

मुख्यमंत्री पदी सर्वेश नाडगौडा याची निवड

तर उपमुख्यमंत्री पदी कु.राहत सारंग व गौरांग बाबरदेसाई यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या चालू शैशणीक वर्षाची सन २०२३-२४ साला करीता घेण्यात आलेली शालेय स्वराज्य निवडणूक नुकतीच बिनविरोध पडली असून शाळेच्या नवनिर्वाचित मंत्री मंडळाच्या तथा शाळेच्या मुख्यमंत्री पदी शाळेचा विद्यार्थी कु.सर्वेश रवींद्र नाडगौडा याची बिनविरोध निवड झाली असून त्याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

        खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी देखरेखीखाली  नव्याने निवडण्यात आलेले शालेय मंत्री मंडळ पुढील प्रमाणे -मुख्यमंत्री - सर्वेश रवींद्र नाडगौडा, उपमुख्यमंत्री - कू.राहत फातिमा इरफान सारंग,गौरंग प्रसन्न कुमार बाबरदेसाई,शिक्षणमंत्री - कु. चैताली विजय गोसावी,आरोग्यमंत्री - कु. इरम नझिर मुकादम,सफाईमंत्री -  निलेश संजय गारगुंडे,क्रीडामंत्री - आयुष निलेश गुरव,सहलमंत्री - कु. तन्वी शक्तीकुमार उपाध्ये,शिस्तमंत्री - कुं.सुकन्या दिनेश पाटणकर, बागकाममंत्री - कु.रिद्दिमा रिझवान मालीम,वाचनालयमंत्री - कु.मनस्वी संतोष जुवाटकर, शा.पो.आहारमंत्री - कु.रिदा झुल्पीकार शेमणे,सांस्कृतिक मंत्री - कु.रिया राजू कट्टी या सर्व शालेय मंत्रिमंडळात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शा.व्य.समितीच्या अध्यक्षा सौ प्राप्ती कट्टी माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ प्रियंका गुरव यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तर शालेय स्वराज्य निवडणूक बिनविरोध पार पडल्या बद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे तसेच मंत्री मंडळात निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी अभिंनंदन केले आहे.
error: Content is protected !!