प्राथमिक गटातून कर्तृत्वा हरकुळकर तर माध्यमिक गटातून प्रतीक्षा पाटील प्रथम
मेघा गांगण यांच्याकडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून कै. विष्णू शंकर पडते गुरुजी यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब कणकवली आयोजित वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्राथमिक शाळा गटातून 15 स्पर्धक व माध्यमिक शाळा गटातून 13 स्पर्धकानी या स्पर्धेत सहभाग घेतला. प्राथमिक गटातून कुमारी कर्तुत्वा हरकुळकर, प्रथम क्रमांक विद्यामंदिर हायस्कूल. द्वितीय क्रमांक कुमारी मीरा आपटे, कनेडी हायस्कूल. तृतीय क्रमांक कुमार वरद तवटे, सेंट उर्सुला स्कूल व उत्तेजनार्थ कुमारी संतोषी आळवे, जि प शाळा क्रमांक दोन कणकवली यांनी यश मिळविले.
माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक कुमारी प्रतीक्षा पाटील, ल.गो. सामंत विद्यालय हरकुळ बुद्रूक. कुमारी तन्वी पारकर, द्वितीय क्रमांक करूळ हायस्कूल. तृतीय क्रमांक भावना सावंत शंकर महादेव विद्यालय,कुंभवडे व उत्तेजनार्थ विधी चिंदरकर, विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.या वक्तृत्व स्पर्धेसाठी प्राथमिक गटाला लोकराजा छत्रपती शाहू महाराज,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , प्लास्टिक बंदी काळाची गरज या विषयावर तर माध्यमिक गटातील स्पर्धक विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक लोकशाहीचे आद्य प्रणेते , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , राजश्री शाहू महाराज शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते, समाज माध्यम ( सोशल मीडिया) व भारतीय तरुणाई , कोरोना नंतर विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता या विषयावर आपले मत मांडले. विद्या मंदिर प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर यांचे मौलिक स्पर्धात्मक मार्गदर्शन मिळाले.श्री मंडवी सर यांनी वकृत्व, कर्तृत्व व नेतृत्व यांची सांगड घालण्याचा उपदेश केला व सौ रुपाली कदम यांनी वकृत्वस्पर्धा विषयाची मांडणी कशी असावी याचे स्पर्धकांना मार्गदर्शन केले व या दोघांनी परीक्षकांची भूमिका ही निस्पृहपणे पार पाडली. चार्टर प्रेसिडेंट रोटेरियन दीपक बेलवलकर, श्री दीपक अंधारी व श्री दादा कुडतरकर तसेच रोटेरियन सौ उमा परब यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले.प्रत्येक गटातून तीन विजेत्या स्पर्धकांना व एक उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. रोटरीयन सौ मेघा गांगण यांनी याच बरोबर आपले वडील कै. विष्णू शंकर पडते यांच्या स्मरणार्थ विद्या मंदिर हायस्कूल मधील सात हुशार, गरीब व होतकरू मुलांना दप्तरे व छत्री वाटप केले.












