कुडाळ येथे पार पडली कोतवाल पदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील 18 व मालवण तालुक्यातील 14 अशी एकुण 32 रिक्त कोतवाल पदांसाठीची आरक्षण सोडत प्रक्रीया कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या कार्यालयात चिन्मय गोसावी या शाळकरी मुलाच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. दरम्यान येत्या काही दिवसातच कुडाळ व मालवण या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी सुध्दा आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.
कुडाळ व मालवण तालुक्यातील पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असुन गुरूवारी या पदांपैकी कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रीया पार पडली. यावेळी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व मालवण तहसीलदार वर्षा झालटे, प्रशिक्षणार्थी डेफ्युटी कलेक्टर स्वाती देसाई, भुमी अभिलेख उपअधिक्षक विनोद काळे, नायब तहसीलदार पी. एल. पवार, निवडणूक नायब तहसीलदार एन. एस पारकर, एस. ए. गवस, मालवण पोलिस उपनिरीक्षक प्रतिक्षा खोत, मालवण नायब तहसीलदार जी. एम. कोकरे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कुडाळ तालुक्यात पुढीलप्रमाणे आरक्षण सोडत पडली. पडवे-अनुसूचित जमाती, वालावल-अनुसूचित जमाती (महीला), गोठोस-भ.ज. ब, बाव-भ. ज. -ब, वसोली- विशेष मागास प्रवर्ग, जांभवड-े इमाव, झाराप- इमाव (महीला), माणगाव- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईएमएस), तर घोटगे, बांबर्डे तर्फ कळसुली, पाट, नेरूर कर्यात नारूर या चार ठिकाणी खुला प्रवर्ग, व हिर्लोक, बिबवणे या दोन ठिकाणी खुला (महीला) असे आरक्षण पडले असल्याचे तहसीलदार अमोल पाठक यांनी जाहीर केले.
मालवण तालुक्यातील मसदे अनुसूचित जाती, बांदीवडे बु.- अनुसूचित जाती (महीला), गोळवण- अनुसूचित जमाती, वायरी- अनुसूचित जमाती (महीला), कांदळगाव- विमुक्त जाती – अ, नांदोस- भटक्या जमाती- ब, श्रावण- भटक्या जमाती भ.ज. क, हिवाळे- भ.-ज. -ड, धामापुर- विशेष मागास प्रवर्ग, भटवाडी व कंभारमाठ या दोन ठिकाणी इतर मागास प्रवर्ग, रामगड- इमाव (महीला), मर्डे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईएमएस, महीला), आंगणेवाडी- खुला असे आरक्षण पडले आहे असे तहसीलदार झालटे यांनी जाहीर केले.दरम्यान कुडाळ व मालवण तालुक्यातील रिक्त कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रीया पुर्ण झाली असुन लवकरच कुडाळ व मालवण या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी ही आरक्षण काढण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया टप्प्या टप्प्याने पुर्ण करुन पदभरती करण्यात येईल अशी माहिती प्रांत ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.













