खारेपाटण एस टी बस स्थानकातून शालेय विद्यार्थी व नागरीकांसाठी जादा बसेस मिळाव्यात

ग्रामस्थानी विभागिय नियंत्रक प्रमुखांची भेट घेऊन दिले मागणीचे निवेदन

खारेपाटण (प्रतिनिधी) : बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य एस टी महा मंडळाच्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण एस टी बस स्थानकातून सद्या शालेय विद्यार्थी व प्रवासी नागरिकांना पुरेशा प्रमाणात व वेळेत एस टी बस उपलब्ध नसल्यामळे शालेय विद्यार्थी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याबाबत नुकतीच म.रा. एस.टी.महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा विभागिय वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री अभिजित पाटील तसेच आगार व्यवस्थापक श्री यादव यांची खारेपाटण ग्रामस्थानी भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन त्यांना सादर केले.

   यावेळी खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,उपसरपंच  श्री महेंद्र गुरव,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,सामजिक कार्यकर्ते श्री महेश कोळसुलकर,श्री मंगेश गुरव, श्री संतोष पाटणकर,राजेंद्र वरुणकर, ग्रा.पं.सदस्य श्री किरण कर्ले,राकेश राऊत आदी मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

  खारेपाटण हे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे एस टी बसस्थांनक असून येथील ब्रिटिशकालीन बाजारपेठेवर आजू बाजूच्या सुमारे ४० ते ५० गावचे नागरिक व विद्यार्थी दैनंदिन दळणवळण, बाजारहाट,शिक्षण, आरोग्य व बँकिंग सेवेसाठी अवलंबून असतात. तर येथे असणारे हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज येथे दशक्रोशितिल नागरिक शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र पुरेशा व अत्यावश्यक वेळेत एस टी बसेस उपलब्ध नसल्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.तर शाळेच्या वेळेत एस टी फेऱ्या उपलब्ध नसल्यामुळे देखील शालेय विद्यार्थ्यांचे शैशनिक नुकसान होत असून परिणामी शालेय विद्यार्थी पटसंख्या देखील घटत आहे. 

       तसेच खारेपाटण एस टी बसस्थांनकात ऑनलाईन तिकीट बुंकिंग सुविधा उपलब्ध नसल्याने कणकवली किंवा अन्य थकानी प्रवशाना जाऊन तिकीट बूकिग करावे लागत आहे.परिणामी येथील प्रवासी वर्गात घट निर्माण होऊन भारमान कमी होत आहे.जर येथे ऑनलाईन तिकीट बुकिंग सुविधा केंद्र निर्माण केल्यास त्याचा फायदा येथील प्रवासी वर्गाला होऊन भारमान वाढण्यास मदत होणार आहे.तरी खारेपाटण एस टी डेपोतील वाढती प्रवासी संख्या घेता मुंबई सह संपूर्ण राज्यात प्रवासी जाण्यासाठी येथे कायमस्वरूपी ऑनलाईन तिकीट बुंकींग सुविधा निर्माण करण्यात यावी. अशी देखील मागणी यावेळी ग्रामस्थानी अधिकारी वर्गाकडे केली. 

     दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या  दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या खारेपाटण - भुईबावडा,खारेपाटण ते पोंभूर्ले - मणचे,खारेपाटण ते वाल्ये -प्रिंदावण, खारेपाटण ते नानिवडे जवळेथर मार्गे हातदे,खारेपाटण ते खारेपाटण रोड रेल्वेस्टेशन चिंचवली मार्गे शेर्पे - खारेपाटण या मार्गावर एस टी गाड्या वेळेत सुरू ठेवणे गरजेचे आहे.त्यामुळे विद्यार्थाचे नुकसान होणार नाही. याबरोबरच खारेपाटण येथील शनिवार हा आठवडा बाजार दिवशी खारेपाटण गावात व बाजारपेठेत आजुबाजूच्या नागरिकांची मोठी गर्दी असते ही बाब लक्षात घेता आठवडा बाजार दिवशी खारेपाटण एस टी बस स्थानकात दोन जादा एस टी बस कायामस्वरूपी देण्यात याव्यात अशी देखील मागणी यावेळी ग्रामस्थानी वाहतूक नियंत्रक प्रमुख अभिजित पाटील यांचेकडे केली आहे. 
error: Content is protected !!