कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुवैभव साहित्य समुह , कणकवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा दुसरा कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार कवयित्री अंजली मुतालिक, कुडाळ यांना जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांच्या हस्ते सावंतवाडी येथे प्रदान करण्यात आला. त्यामुळे व्यासपीठावर डॉ. अमुल पावसकर, डॉ. सतिश पवार, डॉ.रुपेश पाटकर, कवयित्री सरिता पवार , शुभांगी पवार, अर्ज संस्थेचे अरुण पांडे, पत्रकार देवयानी वरसकर, अंजली मुतालिक यांचे आई वडील आदी मान्यवर उपस्थित होते.