आ.वैभव नाईक यांच्यामुळेच तळाशील बंधाऱ्याचे काम मार्गी

राजकीय विरोधकांकडून दिशाभूल ; तळाशील वासियांनी केला निषेध

आचरा (प्रतिनिधी) : दोन दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तळाशीलमध्ये जात घालण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सांगत आमदार वैभव नाईक हेच त्याला जबाबदार असून त्यांनी तळाशिल ग्रामस्थांनी फसवणूक केली असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर तळाशिल ग्रामस्थांनी श्रीकृष्ण मंदिर येथे बैठक घेत त्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.

तळाशिल हे नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने संवेदनशील आहे आणि या भागाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या बंधाऱ्यांची कामे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून योग्य पद्धतीने सुरू असताना काहीजण राजकीय स्वार्थासाठी ग्रामस्थांकडून कोणतीही माहिती न घेता खोटी विधाने करत दिशाभूल करत आहेत. असे सांगत तळाशिल ग्रामस्थांनी झालेल्या बैठकीत त्या विधानाचा निषेध नोंदवला.

error: Content is protected !!