” शासनाच्या उमेद अभियानामुळे खेडेगावातील महिलांचे जीवनमान बदलून गेले आहे.” – आकांक्षा किनळोसकर

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानामुळे महिलांच आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण झालेले दिसून येत आहे. बचतगट, ग्रामसंघ, प्रभागसंघ यांच्या माध्यमातून महिला एकत्रीत येऊन बचत करून व्यवसाय करून स्वतःचा आर्थिक स्तर उंचावत आहेत. सध्या बऱ्याच फायनान्स कंपन्या गावातील महिलांना जास्त व्याजाने कर्ज देत आहेत. आणि मग वसुली करताना मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे महिलांणी अशा मायक्रो फायनान्स कंपन्याच्या भुलथापांना बळी पडू नये. त्याव्यतिरिक्त आपल्या प्रभागातून, ग्राम संघातून, समूहातून 1% व्याज दराने कर्ज मिळते ते कर्ज घेऊन आपण आपले छोटे-मोठे व्यवसाय करू शकता. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हिरकणी प्रभाग संघाची वाटचाल दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने होत आहे. हे आपल्या सर्वांचे यश आहे. ” असे प्रतिपादन हिरकणी प्रभागसंघ माडखोल च्या अध्यक्षा आकांक्षा किनळोसकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना केले.

हिरकणी प्रभागसंघ माडखोल वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच हिरकणी प्रभागसंघ अध्यक्षा आकांक्षा किनोळसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर कोषाध्यक्ष शेजल लाड, सचिव माधुरी चव्हाण, प्रमुख मार्गदर्शक माणगावकर सर,महिला समुपदेशन केंद्र, सावंतवाडीच्या अपिॅता वाटवे, श्रीम. तृप्ती धुरी, नंदकिशोर फोंडेकर, स्वाती रेडकर, प्राची राऊळ, शिल्पा सावंत प्रभाग समन्वयक कुवरसिंग पाडवी, पत्रकार अमोल गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी यशदा पुणे पंचायत राज मास्टर ट्रेनर, माणगावकर सर, महिला समुपदेशन केंद्र, सावंतवाडीच्या अर्पिता वाटवे मॅडम व तृप्ती धुरी मॅडम , पत्रकार अमोल गोसावी, जिल्हा महिला व बाल विकास केंद्र सिंधुदुर्गचे नंदकिशोर फोंडेकर, तालुका व्यवस्थापक IBCB स्वाती रेडकर मॅडम प्राची राऊळ BRP, शिल्पा सावंत प्रभागसंघ व्यवस्थापक बांदा या सर्वांनी उपस्थित महिलांना बहुमोल मार्गदर्शन केले व हिरकणी प्रभागसंघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हिरकणी प्रभागसंघाची सदर वार्षिक सर्वसाधारण सभा माडखोल प्रभाग समन्वयक कुवरसिंग पाडवी यांच्या नियोजनखाली पार पडली. हिरकणी प्रभागसंघ कार्यकारी समिती सदस्य व प्रभागातील सर्व सीआरपी व इतर सर्व केडर, समुहातील महिला उपस्थित होत्या. या सभेसाठी प्रभागातील २७२ महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनयना सांगेलकर यांनी केले तर इतिवृत्त वर्षा मडगावकर यांनी व आभार सेजल लाड यांनी मानले.

error: Content is protected !!