कुडाळ (प्रतिनिधी) : भजनमहर्षी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांच्या ११ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सर्व शिष्यवर्ग, भजन रसिक, चाहता वर्ग यांच्या सहकार्यातून स्वरचिंतामणी स्मारकाची उभारणी भरणी येथे बुवांच्या निवासस्थानी करण्यात आली आहे. आज या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर यांनी भेट देऊन स्मारकाला अभिवादन केले. यावेळी काढण्यात आलेल्या वारकरी दिंडीत ते सहभागी झाले. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्मारक बांधकाम समिती अध्यक्ष निलेश ठाकूर, उपाध्यक्ष योगेश पांचाळ, सचिव संतोष पालव, खजिनदार संजय चव्हाण यांसह शिष्यपरिवार, भरणी ग्रामस्थ, पांचाळ कुटूंबीय उपस्थित होते.
![](https://aplasindhudurg.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-18-at-1.49.58-PM-1024x1024.jpeg)