कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली च्या स्वतंत्र ग्रामपंचायतचा शासन अध्यादेश 11 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. नवीन कुर्ली वसाहत वासीयांची वर्षानुवर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली असून यासाठी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेने घेतलेली मेहनत फळाला आली आहे अशा भावना गावातील जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या. नवीन कुर्ली च्या स्वतंत्र ग्रामपंचायत निर्णयाची प्रत संघटनेचे कार्याध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी सर्व ग्रामस्थांच्या बैठकीत ग्रामस्थांना सुपूर्त केले. यावेळी या निर्णय प्रतिकडे गावकरी आनंदाश्रूनी पाहत होते. यावेळी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेचे कार्याध्यक्ष हरेश पाटील, अध्यक्ष रवींद्र नवाळे, सचिव आनंद सावंत, राजेश तेली, भगवान तेली, चंद्रकांत तेली, काशीराम राणे, शांताराम राणे, एकनाथ चव्हाण, पांडुरंग चव्हाण, सखाराम हुंबे ,उत्तम तेली, सदाशिव चव्हाण, बाळा दळवी, बाळा चव्हाण, मनोहर कदम, आशिष पेडणेकर, जनार्दन पवार, नवीन कुर्ली प्रकल्प संघटनेचे पदाधिकारी, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.