दहा कलाप्रकाराचे मुंबई विद्यापीठात सादरीकरण करणार
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ आयोजित ५६ वा सांस्कृतिक युवा महोत्सव २३-२४ दिनांक १० ऑगस्ट रोजी आनंदीबाई राव राणे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वैभववाडी येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीमधील भारतीय सुगम गायन, शास्त्रीय तालवाद्य, भारतीय समूह गीत, भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोकनृत्य, वक्तृत्व गट (हिंदी), कथाकथन (मराठी), कथाकथन (हिंदी), मिमिक्री, कोलाज या कला प्रकारामध्ये कणकवली कॉलेज, कणकवलीच्या विद्यार्थ्यानी बाजी मारली व एकूण १० कलाप्रकारांची विद्यापीठ पातळीवर निवड झाली आहे. ५६ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवा मध्ये कणकवली कॉलेज, कणकवलीच्या 44 विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या कला प्रकारामध्ये भाग घेतला होता. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 38 महाविद्यालयांचा सहभाग होता, साधारणतः प्रत्येक महाविद्यालातील ३० जारी विद्यार्थी धरले तरी किमान १००० ते १२०० विद्यार्थी आपले नशीब आजमावत असतात एवढी मोठी स्पर्धा युवा महोत्सवाच्या माध्यमातून विभागीय स्तरावर होवून या अटीतटीच्या स्पर्धे मध्ये कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यानी बाजी मारली असून सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण् गावडे, प्रा. हरीभाऊ भिसे, डॉ. मारोती चव्हाण आणि डॉ. अरविंद उमरीकर, प्रा. सचिन दर्पे, प्रा. मिनाक्षी सावंत, प्रा. सिमा हडकर, प्रा. स्विटी जाधव, प्रा. दिपा तेंडोलकर तसेच कलाप्रकारासाठी कोरीओग्राफर म्हणून शेखर गवस, अरविंद वऱ्हाडकर, समीर कांबळे, श्रीधर पाचंगे, सुजित सामंत, सिद्दी मसूरकर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले या सर्व विद्यार्थ्याचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. सौ. राजश्री साळुंखे मॅडम, सेक्रेटरी श्री. विजयकुमार वळंजू, संस्था पदाधिकारी, कॉलेजचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.