“मेरी मिट्टी मेरा देश” या अभियान अंतर्गत आशिये गावात शिला फलकाचे अनावरण

आशिये ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण करण्याचा मान निवृत्त पोलीस विठोबा गुरव यांना

निवृत्त पोलीस,सैन्यदल, नौदल मध्ये सेवा बजावलेल्या व्यक्तींमत्वाचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान अंतर्गत आशिये गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा पार पडला.यानिमित्ताने आशिये ग्रामपंचायत ध्वजारोहण करण्याचा निवृत्त पोलीस विठोबा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच गावातील सेवानिवृत्त पोलीस,सैन्यदल, नौदल मध्ये सेवा बजावलेल्या १४ व्यक्तींमत्वाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.ग्रामपंचायत परिसरात बेल,शमी वृक्ष लागवड सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान अंतर्गत आशिये ग्रामपंचायत येथे शिला फलक अनावरण करण्यात आले.हातात दिवे घेवून पंच प्रण शपथ,माझी वसुंधरा,राष्ट्रगीत ,राज्य गीत,विजयी गीत गाण्यात आले.देशातील जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावलेल्या व्यक्तींमत्वाचा सत्कार करणेत आला.यावेळी भिकाजी अस्वेकर, दत्ताराम गुंजवटे, शरद राऊत ,नारायण राऊत,विठोबा गुरव ,अनिल पावसकर, देवेंद्र गुरव,सत्यवान धुरी, आशिष गराटे, संतोष गुरव, देवेंद्र गुरव यांचा सन्मान शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच महेश गुरव,उपसरपंच संदीप जाधव ,माजी सरपंच शंकर गुरव, ग्रामपंचायत सदस्य विशाखा गुरव, मानसी बाणे,संजना ठाकूर,अविराज मराठे, सुहास गुरव, दिपाली गुरव,प्रवीण ठाकूर,समीर ठाकूर, ग्रामसेवक राकेश गोवळकर,दुर्वा जाधव,प्रियंका कोरगावकर,विनायक ठाकूर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.मुख्याध्यापक सावंत मॅडम,शिक्षक,कर्मचारी ,आशा व अंगणवाड़ी सेविका उपस्थित होते.

error: Content is protected !!