खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पंचशील नगर येथील रहिवासी असलेला तेजस दिलीप पाटणकर उर्फ भाई पाटणकर वय – ३० वर्षे याचे आज रविवार दी.१३/८/२०२३ रोजी रात्री २.०० वाजता गोवा बांबुळी मेडिकल कॉलेज येथे उपचरादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त खारेपाटण पंचक्रोशीत समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तेजस उर्फ भाई पाटणकर हा युवक गुरवार दी.१०/८/२०२३ रोजी खारेपाटण – गगनबावडा,कोल्हापूर रोड मोसम,ता .राजापूर येथे रात्री.८.०० च्या दरम्यान स्कूटी अपघातात जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक नागरिकांनी व नातेवाईक यानी तातडीने त्याला खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथून पुढे सिव्हील रुग्णालय सिंधुदुर्ग व त्यानंतर लगेच गोवा मेडिकल कॉलेज बांबुळी येथे पुढील उपचारासाठी नेले होते. येथे दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तेजस पाटणकर याचे आज रविवारी गोवा बांबुळी येथे उपचार दरम्यान निधन झाले. तेजस उर्फ भाई पाटणकर या युवकाच्या पाठीमागे त्याची पत्नी २ वर्षाची लहान मुलगी व ८ महिन्याचा लहान मुलगा व आई वडील,लहान भाऊ बहिण असा परीवार आहे.