सामाजिक बांधिलकीचा मंत्र महोत्सवातून मिळतो – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात उडान महोत्सवाचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात कणकवली कॉलेज,कणकवली व मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जिल्हा स्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. “उडानसारखा महोत्सव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणारा असून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा मंत्र देणाऱा हा उपक्रम असतो” असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी केले .

या वेळी विचारमंचावर आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डाँ. कुणाल जाधव , प्रा. डॉ. विश्वभंर जाधव, प्रा. डॉ.वृंदा मांजरेकर, डॉ. राजश्री साळुंखे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विजयकुमार वळंजू, शिक्षण प्रसारक मंडळाचे एस. डी. ओ. डॉ. संदीप साळुंखे, प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे व आजीवन अध्ययन विस्तार व विस्तार विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर उपस्थित होते.

या प्रसंगी उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. राजश्री साळुंखे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, “विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहचविता येतो. कला हे समाज जागृती चे मोठे माध्यम असते”. याप्रसंगी मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. कुणाल जाधव यांनी उडान महोत्सवाचे महत्व विशद करून या महोत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धेना शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा हा गौरव असल्याचे मत व्यक्त करून “रिच टू अनरिच” या बोधवाक्याची जाणीव करून दिली.

शिक्षण प्रसारक मंडळाचे एस.डी.ओ. डॉ. संदीप साळुंखे यांनी “कलेच्या माध्यमातून मनातील विचार व्यक्त करता येतात ;त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक ना एक कला जोपासली पाहिजे असे”असे मत व्यक्त केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठ वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व उडान महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
अर्थाजनासाठी कलेचे महत्व जोपासा – विजयकुमार वळंजू

या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांनी मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यानी शिक्षणाबरोबरच अन्य कलागुणांचा अंगीकार करावा. अर्थार्जन करण्यासाठी अशा कलागुणांचा अवलंब करावा *असे प्रतिपादन त्यांनी केले. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय विकास अधिकारी कृष्णा डील्लेवार यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी व आभार प्रदर्शन प्रा.सुरेश पाटील यांनी केली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातून जवळपास ३५० विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!