आचरा गोळीबार प्रकरण ; कुख्यात गुंड शुभम जुवाटकर चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आचरा तिठ्यावरील भरदिवसा चाकुहल्ला आणि गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड शुभम जुवाटकर चा जामीन अर्ज जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश श्री. संजय भारुका यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. यासंदर्भात आचरा पोलीस ठाणे प्रभारी एपीआय अनिल व्हटकर यांनी आपले म्हणणे जिल्हा सरकारी अभियोक्त्यांकडे मांडले. आरोपी शुभम संतोष जुवाटकर ( रा दांडी, ता मालवण ) याने आचरा तिठ्यावर भर दिवसा चाकु हल्ला Cbse नंतर आपल्या ताब्यातील पिस्टल ने 3 राऊंड फायर केले होते.4 मे 2023 रोजी सायंकाळी 5 ते सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या खुनी हल्ल्याने आचरा आणि मालवण परिसरात दहशत माजली होती.याबाबत गौरव प्रकाश पेडणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शुभम जुवाटकर सह तौकिर काझी, प्रतीक हडकर, जगदीश पांगे यांच्याविरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 5 मे रोजी अटक केलेला कुख्यात गुंड शुभम हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामिनावर मुक्ततेसाठी अर्ज सादर केला होता.त्याला हरकत घेताना सरकारी वकील देसाई यांनी शुभम जुवाटकर हा नामचीन गुंड असून त्याच्यावर मुंबईतून तडीपारी ची कारवाई झालेली आहे.सराईत गुन्हेगार शुभम वर घाटकोपर पोलीस ठाण्यात मर्डर, हाफ मर्डर, मारामारी, मारामारी चे अनेक गुन्हे दाखल असून मालवण पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात अनेक गुन्हे याआधी दाखल आहेत. आरोपी ला जामीन मिळाल्यास तो परागंदा होऊन न्यायालयीन तारखांना गैरहजर राहू शकतो, फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या जीवितास आणि मालमत्तेस हानी पोचवू शकतो, आरोपीचे अन्य तिघे साथीदार जामिनावर मुक्त असून त्यांचोसोबत संगनमत करून फिर्यादी व साक्षीदारांच्या जीवितास धोका पोचवू शकतो, आरोपी शुभम हा व्यसनाधीन असून व्यसनाच्या नशेत तो फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जीवाला धोका पोचवू शकतो हे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री संजय भारुका यांनी आरोपी शुभम जुवाटकर चा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!