सिंधुदुर्गातील सर्पमित्रांचा अनोखा उपक्रम

भव्य रक्तदान शिबिराचे नांदगाव येथे आयोजन

कणकवली (सत्यवान गावकर): रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे या उक्तीला अनुसरून सर्प इंडिया सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या चतुर्थी सन तोंडावर येऊन ठेपला असताना असंख्य लोक कोकणात उतरतात आणि सिंधुदुर्गात होणाऱ्या अपघातांमुळे सिंधुदुर्गामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो आणि याचा फटका जनतेला सोसावा लागतो त्याच अनुषंगाने 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 पर्यंत नांदगाव उपकेंद्र मुंबई-गोवा हायवे माईन फाटा येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराकरिता डॉ. तपसे (नांदगाव) यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि या भव्य रक्तदान शिबिरास उपस्थित राहुन सहकार्य करावे असे सर्प इंडिया सिंधुदुर्ग व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क – मंदार राणे: 9545467278
सुदेश पाटील: 7770043652
राजेश भोगले: 7620692531
विठ्ठल बिडवे: 9766741919
रिद्धेश तेली: 9579162936
सत्यवान चव्हाण: 8766748311

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!