जालन्यातील लाठीचार्जचे सिंधुदुर्गात पडसाद

निषेधासाठी सोमवारी मराठा समाजाचा मोर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : जालना येथील मराठा समाज उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि हवेतील गोळीबाराचा सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्या वतीने निषेध करत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केला. सोमवारी 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठा समाज आंदोलनानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.नितेश राणे याना मराठा समाजाबद्दल प्रेम असेल तर लाठीचार्ज चे समर्थन करणाऱ्या गृहमंत्री फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्याचे धाडस दाखवावे असे आव्हान ही सावंत यांनी नितेश राणेंना दिले. पक्ष बदलला की आपली राजकीय भूमिका बदलणाऱ्या नितेश राणेंना स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाषा बदलण्याची सवय आहे.काँग्रेस मध्ये असताना धर्मनिरपेक्ष होते आता भाजपात जाऊन हिंदुत्ववादी असल्याचा आव आणला आहे.सोमवार च्या मोर्चात मराठा समाजासह मराठा प्रेमी समाजानेही सहभागी व्हावे असे आवाहन सतीश सावंत यांनी केले. आमदार वैभव नाईक म्हणाले की, मराठा समाज एकत्र येऊन शांतपणे राज्यभरात आंदोलन करत आहे. महाविकास आघाडी सरकार काळात ही आंदोलने झाली.पण ते दडपण्याचा प्रयत्न कधीच सरकारने केला नव्हता.मात्र फडणवीस शिंदें च्या सरकारने जालना येथे सुरू असलेले हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार करण्यात आला.उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस हे पोलिसांवर दगडफेक झाल्याने लाठीचार्ज केल्याचे सांगत या लाठीचार्ज चे समर्थन केले आहे. सोमवारी कणकवलीत होत असलेल्या लाठीचार्ज विरोधी आंदोलनातून पक्षभेद विसरून सर्व मराठा समाज एकवटून या घटनेचा निषेध करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!