प्रशासनाची डोळेझाक – माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर
कणकवली (प्रतिनिधी): गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबर पर्यंत कणकवली शहरातील हायवे उड्डाणपुलाखाली नाशवंत फुले, भाजी दुकाने आणि पार्किंग ला मुभा देण्याचा निर्णय कणकवली नगरपंचायत च्या बैठकीत घेण्यात आला.मात्र याला हरताळ फासत सरसकट शोभेच्या वस्तुंची दुकाने उड्डाणपुलाखाली थाटण्यात आली असून याकडे कणकवली नगरपंचायत प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केला. जर मखर सजावटी ची दुकाने थाटली तर बाजारपेठेतील दुकानदारांनीही आपली अन्य दुकानेही उड्डाणपुलाखाली थाटली तर याला जबाबदार कोण ?असा सवालही माजी उपनगराध्यक्ष पारकर यांनी उपस्थित केला. गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत च्या नुकतीच बैठक झाली .या बैठकीत शहरात वाहतुक कोंडी होऊ नये, तसेच गणेशभक्त तसेच वाहहनचालकांना त्रास होऊ नये यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले. शहरातील उड्डाणपुलाखाली केवळ नाशवंत फुल, भाजी विक्रेत्याना आणि पार्किंग साठी 30 सप्टेंबर पर्यंत मुभा देण्यात आली.परंतु नगरपंचायत च्या या निर्णयाला हरताळ फासत उड्डाणपुलाखाली मखर सजावटीसाठी ची दुकानेही थाटण्यात आली आहेत. याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केला आहे.