नेशन बिल्डर अवॉर्ड ने शिक्षकांना केले सन्मानित
कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलने, रोटरी इंडिया लीट्रसी मिशन अंतर्गत ” नेशन बिल्डर अवॉर्ड ” हा कार्यक्रम ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडीयल विद्यालय, वरवडे येथे यशस्वी रीत्या पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मेडिकल कॅम्पस व रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे अध्यक्ष रोटेरीयन शंकर परब उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. राजेश कदम यांनी केले त्यात त्यांनी रोटरी इंडिया लीट्रसी मिशन विषयी सर्व उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. लिटरसी उपक्रमा अंतर्गत
T-Teacher Support
E-E-Learning
A-Adult Literacy
C-Child Development
H-Happy School बाबत
रोटरीने केलेल्या विविध कामांची माहिती दिली.
या विशेष कार्यक्रमात विविध शाळेतील, कॉलेजातील 7 उपक्रमशील शिक्षक, प्रोफेसर यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल श्रीफळ व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
१) श्री वामन तर्फे – शिरवंडे हायस्कूल शिरवंडे
२) श्री पी जे कांबळे- विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
३) सौ मयुरी राणे – जिल्हा परिषद शाळा, रेंबवली
४) सौ श्वेता गावडे – आयडीयल स्कूल, वरवडे
५) श्री विजय रासम, फोंडाघाट हायस्कूल
६) Dr. बी जी गावडे, कणकवली कॉलेज
७) श्री प्रशांत अमृते, कणकवली कॉलेज
दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोटे. राजेश कदम यांनी केले ,
कार्यक्रमाला रोटरी मधून गुरु पावसकर – क्लब लीट्रसी हेड ,भेराराम राठोड ,उमा परब, उपस्थित होते .
तसेच आयडीयल स्कूल मधील संचालक व ज्येष्ठ शिक्षक तानावडे सर, संचालक बुलंद पटेल, अर्चना देसाई मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते . शाळेतर्फे तानावडे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.










