कणकवली बाजारपेठेतसुद्धा नियमांची अमंलबजावणी गरजेची

व्यापाऱ्यांची दुकाने गटारावर आणि रस्त्यावर

कणकवली (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात व्यापारी, पार्किंग, वाहतूक व्यवस्था आदींबाबत नगरपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यावर, गटारावर मांडू नये असा निर्णय घेण्यात आला आहे.त्याला शहरातील व्यापाऱ्यांनीही होकार दिला.मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.मुख्य बाजारपेठेत सर्रास दुकानाबाहेरसुद्धा वस्तू रचलेल्या असतात. गटार आणि रस्त्यावर सुद्धा दुकानदार आपल्या दुकानातील वस्तू रचून विक्री करतात.साहजिकच याचाही फटका पादचारी आणि वाहनचालकांना बसतो. आज उड्डाणपुलाखाली लावलेल्या दुकानावर नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ कारवाई करत तत्परता दाखवली.तीच तत्परता दाखवत मुख्य बाजारपेठेतील जे दुकानदार दुकानाबाहेर रस्त्यावर आणि गटारावर वस्तूं मांडून व्यापार करतात त्यांच्यावरही कारवाईचा बडगा नगरपंचायत प्रशासनाने उगारावा अशी मागणी वाहतूक कोंडीने त्रस्त होणाऱ्या ग्राहकांतून होत आहे.

error: Content is protected !!