कुडाळ (अमाेल गाेसावी) : तालुक्यातील नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिरात गेले ७ दिवस नाईक बंधू यांचा हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला. या हरिनाम सप्ताह मध्ये गावातून श्री. देव कलेश्वर मंदिर कडे हरिनामाच्या गजरात दिंडीचे आगमन होत असते. यामध्ये श्री. देव कलेश्वर विद्या मंदिर, नेरूर, साईचे टेंब, चौपाटी, कांढरी, वाघोसेवाडी, वसुसेवाडी, वाघचौडी, कै. स्व : मालक बाबी कलोंगण आणि कुलदेवता मित्रमंडळ नेरूर पार या सर्वांनी आपल्या वाडी मधून ढोल ताशांच्या गजरात आणि ” ज्ञानबा तुकाराम ” या हरिनामाच्या घोषात आकर्षक देखाव्या सह दिंढ्या काढण्यात आल्या. आज सकाळी श्री. देव कलेश्वर महाराजांची पालखी विठ्ठल रखुमाई मंदिर नेरूर चौपाटी येथे नेण्यात आली. नंतर नारायण मंदिर वाघोसेवाडी येथे आली. त्या नंतर मारुती मंदिर नेरूर येथे पालखीचे आगमन झाले. नंतर ढोल ताशांच्या गजरात सप्त्यातील सर्व भक्तगण कलेश्वर मंदिरा भोवती एक फेरी मारून सर्व जन नेरूर मारुती मंदिर चे दिशेने गेले. तसेच तळीमध्ये स्नान केलं आणि पुन्हा मंदिरामध्ये आगमन होऊन आरती करण्यात आली. आणि त्या नंतर शेवटी सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. अशा प्रकारे हरिनाम सप्ताहची काल्याने सांगता झाली.
नेरूर येथील कलेश्वर मंदिरातील सप्ताहची काल्याने सांगता












