देवगड (प्रतिनिधी) : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेच्या वतीने वाडा हायस्कूल मध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य स्पर्धेत तालुकास्तरावर शेठ म.ग. हायस्कूल च्या परिवर्तन या विज्ञान नाट्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या नाट्यामध्ये प्रशालेतील प्रांजली कानेटकर, शर्वरी शेडबाळे, कृतिका टोणपे, सावरी कांबळे, श्रेया गावकर, धैर्य सावंत, अभिनव खडपकर,दत्तप्रसाद वंजारे या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या.
या नाटकाचे लेखन, नेपथ्य तसेच दिग्दर्शन प्रशालेचे माजी मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी केले.
संगीत साथ हर्ष बोंडाळे , राज्ञी कुळकर्णी, आयुष भिडे, मयूर नाटेकर, चैतन्य कोयंडे या विद्यार्थ्यांनी दिली. या नाट्यास रश्मी ठाकूर , किर्ती किरकिरे सर्व विज्ञान शिक्षक तसेच राजेंद्र कोयंडे , उमेश कोयंडे ,प्रसाद शेवडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, या यशाबद्दल सर्व संस्थाचालक,तसेच मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षक सुनील घस्ती ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.