” शारीरिक सरावातील सातत्य निरोगी आयुष्याचा महामार्ग होय”

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल

कुडाळ ( अमोल गोसावी ) : “शारीरिक व्यायामातील सातत्य राखणारी फिजिओथेरपी उपचार पद्धती हा निरोगी आयुष्याचा महामार्ग होय. औषधाचे दुष्परिणाम टाळून शारीरिक तंदुरुस्ती राखणारी वैद्यकीय उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी होय.” असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांनी काढले. ते कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी सप्ताहाच्या सांगता समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते .त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “वेदना मुक्त जीवनासाठी फिजिओथेरपीचा प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपण समाज जनजागरण केले पाहिजे. यासाठी विविध उपक्रमातून आपण समाजात पोहोचले पाहिजे ; जेणेकरून फिजिओथेरपी उपचार पद्धती लोकांना ज्ञात होऊ शकेल .असे सांगत बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेने निरोगी आरोग्याची भविष्यातील मानवी गरज ओळखून कुडाळ सारख्या शहरांमध्ये जे फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू केलेले आहे ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे.”असे सांगत या महाविद्यालयाच्या वाटचालीस , संस्था चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या संस्थेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. यांच्यासोबत व्यासपीठावर त्यांचे सहकारी ए. पी. आय.सचिन हुंदळेकर,बॅ नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सौरभ धर, कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी ,सहयोगी प्रा. वैशाली ओटवणेकर , इत्यादी उपस्थित होते.

याच दिवशी जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त एस एस पी एम लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचे मेडिकल सुपरिटेंडन्ट डॉ. आर एस कुलकर्णी हेही उपस्थित होते. त्यांनी सर्जरी व सर्जनोत्तर उपचार पद्धतीमध्ये अॉर्थोपेडिक उपचार पद्धतीचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व विशद करताना सर्जरी केल्यानंतरच्या आरोग्यासाठी अॉर्थोपेडिक उपचार पद्धतीचे असणारे महत्त्व प्रतिपादन केले व त्या उपचार पद्धतीची माहिती उपस्थितांना देऊन विविध प्रात्यक्षिकामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान फिजिओथेरपी सप्ताह साजरा केला. यामध्ये ४ सप्टेंबर रोजी सर्व फिजिओथेरपी विद्यार्थ्यांसाठी डॉ. सचिन चौधरी , आणि डॉ. नेहा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसायन्स आणि कार्डिओपल्मोनरी फिजिओथेरपीची मूलभूत कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके आयोजित केली होती. ५ सप्टेंबर रोजी आरोग्य धोक्यांविषयी जागरूकता, अनेक रोगांवरील प्रतिबंध, जोखीम घटक आणि फिजिओथेरपी मूल्यांकन आणि उपचारांसाठी जागरूकता देण्यासाठी मोफत आरोग्य सेवा निदान शिबिर. तसेच ६ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी अप्रतिम कलागुण आणि कार्यक्रम सादर केले.. ७ सप्टेंबर ह्या दिवशी प्राध्यापक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमास सर्वंकष मूल्यमापन आणि उपचारांसाठी भेट दिली होती. ८ सप्टेंबर रोजी फिजिओथेरपी सप्ताहाचा सांगता दिवस म्हणजेच जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला. हा दिवस साजरा करताना विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ज्यामध्ये मनोरंजनात्मक व उद्भोजनात्मक पथनाट्य, मिमिक्री माहीम इत्यादी विविधरंगी कार्यक्रमाचा समावेश होता.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकश्री सौरभ कुमार अग्रवाल , हे प्रमुख पाहुणे आणि डॉ. आर.एस. कुलकर्णी, (वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन,तथा मेडिकल सुप्रीटेंडंट, एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयातील ऑर्थोपेडिक्सचे प्राध्यापक) उपस्थित होते. विशेष म्हणजे प्राचार्य डॉ .सौरभ धर व प्रा.डॉ.प्रगती शेटकर ,डॉ शरावती शेट्टी, डॉ रोहण भांगरे,.डॉ.ज्योतीरंजन पट्टासिंग, प्रसाद कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सप्ताहात कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यानीच केलेले होते.

error: Content is protected !!