तालुकास्तरीय शालेय खो. खो. स्पर्धेत चौके हायस्कुलचे यश

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुकास्तरीय शालेय स्पर्धा नुकत्याच रेकोबा हायस्कुलच्या पटांगणावर पार पडल्या यावेळी खो खो स्पर्धेमध्ये भ ता चव्हाण म मा विद्यालय चौके च्या १४ वर्षाखालील मुलांनी कट्टा हायस्कुलचा पराभव करत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. चौके हायस्कुलची जिल्हा स्तरावर होणाऱ्या खो खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री वाघमारे सर, क्रीडा प्रशिक्षक श्री अनिल आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मुख्याध्यापिका सौ रसिका गोसावी, स्थानिक समिती अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!