खारेपाटण -टाकेवाडी येथे बिबट्याचा बकऱ्या वर हल्ला

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा – प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण सह आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला असून गुरवार दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास बिबट्याने खारेपाटण टाकेवाडी येथील महिला शेतकरी शशिकला सावंत यांच्या बकऱ्या वर हल्ला करत त्याला ठार मारले.यामुळे या शेतकरी महिलेचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की,खारेपाटण टाकेवाडी येथील शेतकरी शशिकला सावंत यांच्या मालकीचा असलेला बकरा हा घरा शेजारील रानात चरत असताना बिबट्याने येऊन त्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे या बकऱ्याच्या सोबत असलेल्या राखण्या समोरच ही घटना घडली असे सांगण्यात येत आहे.सदर घटना ही लोकवस्ती पासून सुमारे २५० मीटर अंतरावर घडली असून यामुळे नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेआहे. घटनेची माहिती मिळताच खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.व सबंधित नुकसानग्रस्त शेतकरी महिलेची भेट घेतली. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली असून खारेपाटण पोलीस पाटील दिगंम्बर भालेकर यांना देखील कळविण्यात आले आहे.यावेळी घटनास्थळी सावंत,खारेपाटण पशुवैद्यकीय अधिकारी भुते, पशुवैद्यकीय चे जाधव ,ग्रामपंचायत सदस्य दक्षता सुतार आदी उपस्थित होते. सदर घटनेची वनविभागाकडून पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खारेपाटणसह आजूबाजूच्या परिसरात गेले १५ दिवसापासून अधिक काळ बिबट्याचा वावर वाढला असून या बिबट्याने आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे नुकसान केलेले आहे.दिवसाढवळ्या लोकवस्ती जवळ येऊन पोहचत असलेला हा बिबट्या आता एखाद्या मनुष्यावर हल्ला केल्यावर किंवा त्याला ठार मारल्यावर महाराष्ट्र शासनाचा वनविभाग जागा होणार आहे का? असा सवाल खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी उपस्थित केला असून संबंधीत बिबट्याचा वनविभागाच्या वतीने तबोडतोब बंदोबस्त करण्यात यावा.अशी मागणी देखील सरपंच प्राची ईसवलकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!