मसुरे येथील पाककला स्पर्धेमध्ये ज्योती दीपक पेडणेकर विजेती तर हेमलता दुखंडे उपविजेती

मसुरे (प्रतिनिधी): पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर पोषक जेवण बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मसुरे केंद्र शाळेच्या वतीने तृणधान्य पाककला स्पर्धा श्री दाजी साहेब प्रभूगावकर केंद्र शाळा मसुरे नं. 1 मालवण या प्रशालेत तृणधान्य पाककला कृती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ज्योती दीपक पेडणेकर विजेती तर हेमलता दूखंडे उप विजेती ठरली. स्वयंपाकी, मदतनिस् ,ग्रामस्थ, पालक यानी स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता. अनेक रुचकर पदार्थ स्पर्धेसाठी मांडण्यात आले होते.प्रथम क्रमांक.ज्योती पेडणेकर द्वितीय क्रमांक हेमलता दुखंडे तृतीय क्रमांक आसावरी ठाकूर उत्तेजनार्थ प्रथम शितल मसुरकर ,उत्तेजनार्थ द्वितीय सानिका फरांदे, उत्तेजनार्थ तृतीय लक्ष्मी पेडणेकर यांची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील उत्तम पदार्थ सादरीकरण म्हणून स्नेहल दुखंडे, अस्मिता तोंडवळकर यांचेही परीक्षकांनी कौतुक केले.यावेळी प्रशाला मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख नारायण देशमुख,कार्यक्रम संयोजक विनोद सातार्डेकर, गोपाळ गावडे रामेश्वरी मगर, शिपा शेख, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, उपाध्यक्ष संतोष दुखडे, सन्मेष मसुरेकर आदी उपस्थित होते. सर्व विजयी स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यानी विजेत्यांचे अभिनंदन केले तर या स्पर्धेचे परीक्षण पुनम चव्हाण मालवण आणि शीतल मापारी वेराली यांनी केले. परीक्षिका पूनम चव्हाण यांनी पाककला स्पर्धेच्या निमित्ताने सर्व स्पर्धकांना स्पर्धेदरम्यान कशा पद्धतीने आपली पाक कला सादर केली पाहिजे याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनोद सातार्डेकर यांनी मांडले. सर्व मान्यवरांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शितल मसुरकर यांनी केले. स्पर्धेचे नियोजन केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांनी सुयोग्य रीतीने केले होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!