खारेपाटण (प्रतिनिधी): गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील खारेपाटण बाजारपेठ ही फुला फळांनी तसेच गणपतीच्या आरस सजावटी करीता आवश्यक असलेल्या वस्तूंनी सजली असून ग्राहकांची खरेदीसाठी एकच झुंबड उडालेली आहे. गणपतीची बाप्पाचे आगमन घरी होण्या अगोदरच मुंबईकर चाकरमानी तथा गणेश भक्त हे कोकणात आपल्या मूळगावी आले असून आजूबाजूच्या सुमारे ४० ते ५० गाव अवलंबून असलेल्या खारेपाटण बजारपेठेत विविध आकर्षक सजावट साहित्यानी खारेपाटण बाजारपेठ ही सजून गेली आहे. खारेपाटण ग्रामपंचायत व स्थानिक पोलीस प्रशासन यांनी वाहतुकी बाबत योग्य नियोजन केल्यामुळे बाजारपेठेत सामान खरेदी करताना नागरिकांना कोणतीच अडचण आली नाही. व्यापारी वर्गाने देखील ग्राहकांचे स्वागत करून त्यांना सहकार्य केले. तर गेली तीन/चार दिवस खारेपाटण बाजारपेठ ही नागरिकांच्या गर्दीने विविध वस्तू घेण्यासाठी फुल्ल झालेली दिसत होती. तर खारेपाटण मध्ये आजपासूनच लहान मोठ्या घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीना आणायला सुरवात झाली असून खारेपाटण संभाजीनगर येथील प्रतिष्ठित नागरिक मधुकर शेठ गुरव यांचा घरगुती गणपती ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत खारेपाटण बजरपेठेतून नेण्यात आला.