कॉलेजमधील मित्रानेच केला प्रसाद लोके चा घात
एलसीबी आणि देवगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
आरोपी किशोर परशुराम पवार ला 7 दिवस पोलीस कोठडी
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : देवगड तालुक्यातील मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके याचा खून मयत प्रसाद चा कॉलेजमधील मित्र किशोर परशुराम पवार रा.कुंभारमाठ, ता .मालवण याने केल्याचे एलसीबी सिंधुदुर्ग आणि देवगड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एलसीबी ने आरोपी किशोर पवार याला ताब्यात घेतल्यानंतर देवगड पोलीसानी त्याला अटक केली. अवघ्या 12 तासांमध्ये प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नसताना केवळ मोबाईल नं द्वारे खूनासारख्या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबी आणि देवगड पोलिसांना यश आले आहे. मयत प्रसाद लोके आणि आरोपी किशोर पवार हे कॉलेजकाळातील मित्र असल्याची माहिती मिळत असून कॉलेज मधील मित्रानेच मयत प्रसाद चा घात केल्याचे समोर आले आहे.दरम्यान आरोपी किशोर पवार याला देवगड येथील न्यायालयात हजर केले असता त्याला 25 सप्टेंबर पर्यंत 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ऐन गणेशचतुर्थी च्या आदल्या दिवशी प्रसाद लोके याचा मृतदेह मशवी येथे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेला आढळला होता. प्रसाद लोके वॅगनार कारने प्रवासी भाडे असल्या कारणाने 18 सप्टेंबर रोजी पहाटे घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह वॅगनार कार लगत रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला होता.त्याची कारच्या काचाही फोडलेल्या होत्या. तसेच मयत प्रसाद चा मोबाईल घटनास्थळी नव्हता. या घटनेचा तपास एसपी अग्रवाल, अतिरिस्क पोलीस अधीक्षक बगाटे, डीवायएसपी कृष्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले, एपीआय महेंद्र घाग, पीएसआय आर बी शेळके, ए एस आय गुरू कोयंडे, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, आशिष गंगावणे, किरण देसाई, पोलीस नाईक आशिष जमादार, यश आरमारकर तसेच देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला. सायबर सेल च्या मदतीने हा गुन्हा उघडकीस येण्यास मदत झाली. अधिक तपास देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करत असून अवघ्या 12 तासांत खूनासारख्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल एलसीबी च्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे व देवगड पोलिसांचे कौतुक होत आहे.