संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांनी गुगलद्वारे शोधला मोहम्मद अख्तर हुसेन यांचा पत्ता
खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते संदिप परब यांच्या पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रमातील कार्यकर्त्यांनी नुकतेच मानसिक आजारी अवस्थेत भरकटलेल्या मोहम्मद अख्तर हुसेन (वयः५०) यांचे कुटुंबीयांचा गुगल आधारे शोध घेत त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिले.
जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग येथे एमएलसी नंबर ९६०/२०२३ द्वारे दिनांक ११ सप्टेंबर,२०२३ रोजी दाखल असलेल्या व उपचाराने बरे झालेल्या रूग्ण मोहम्मद अख्तर हुसेन या फिरस्ता व बेवारस असलेल्या ईसमाचे मुळ नाव गाव पत्ता समजून येत नव्हते. म्हणून त्यांना सावंतवाडी पोलिस स्टेशनच्या दिनांक ११ सप्टेंबर,२०२३ च्या पत्राद्वारे संविता आश्रमात दाखल कराण्यात आले होते. सदर व्यक्ती सावंतवाडी परिसरात पोलिसांना जख्मी व आजारी अवस्थेत आढळून आली होती .गोवा येथे लेबर काम करण्यासाठी जात असताना मध्येच त्यांना अपघात होवून डोक्याला मार लागल्याने मानसिक तणावामुळे ते त्यांचा राहत असलेला पत्ताही विसरले होते.
संविता आश्रमातील उपचाराने बरे झाल्यावर त्यांनी त्यांच्या बिहार राज्यातील मु.मुजफ्रा माली टोल सरैय्या ता.बिरपूर जि.बेगुसराय…ची माहिती दिली.संविता आश्रमात कार्यरत असलेले युवा सामाजिक कार्यकर्ते माधव पाटिल यांनी गुगल द्वारे व बिहार पोलिसांच्या सहकार्याने त्यांचे गाव व नातलगांचा यशस्वी शोध लावला. आज मोहम्मद अख्तर हुसेन यांस, त्यांना नेण्यासाठी बिहार येथून संविता आश्रमात दाखल झालेले हुसेन यांचे चिरंजिव मोहम्मद असलम हुसेन आणि भाऊ मोहम्मद शहादत हुसेन यांचे हवाली केले. तत्पुर्वी कुडाळ पोलिस स्टेशन येथे पोलिस अधिकारींचे सहाय्याने आवश्यक नातेवाईक व्हेरिफिकेशनची प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. संविता आश्रमातील सर्व केअर टेकर व नर्सिंग स्टाफने मोहम्मद अख्तर हुसेन यांची काळजी घेतली होती.