ग्रामस्तरावर सेल्फी पॉईंट बनवण्याचा पहिला मान लोरे नं 1 ग्रा.पं ला
कणकवली (प्रतिनिधी) : पं स चे माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुंदर माझं गाव लोरे या सेल्फी पॉईंट चे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की सेल्फी पॉईंट हा नगरपंचायत नगरपालिका सारख्या शहरी भागात बनवला जातो. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावरती सुंदर माझं गाव लोरे या टॅगलाईन वर बनवण्यात आलेला सेल्फी पॉईंट खरेच लोरे नं 1 गावच्या सौंदर्यात आणखी भर टाकणारा आहे. मनोज रावराणे,सरपंच अजय रावराणे यांच्या संकल्पनेतून लोरे नंबर १ या गावामध्ये बनवण्यात आला. ग्रामीण भागात ग्रामस्तरावर सेल्फी पॉईंट बनविण्याचा मान सिंधुदुर्गात सर्वप्रथम लोरे नं 1 या माझ्या विधानसभा मतदारसंघातील गावाने मिळवला आहे याचा मला आनंद आहे. लोरे गावाने यापूढेही आपली सर्व क्षेत्रांतील प्रगती कायम ठेवावी. यावेळी सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्री तुळशीदास रावराणे, पं स माजी सभापतीमनोज रावराणे,लोरे नं 1 सरपंच अजय रावराणे ,उपसरपंच सुमन गुरव ,ग्रा पं सदस्य नरेश गुरव, सुनील रावराणे,अनंत रावराणे,बाबा रावराणे,आणि गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.














